विराटची विक्रमी खेळी : सचिनचा रेकॉर्ड मोडला

मुंबई-वृत्तसेवा | येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या न्यूझीलंड विरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पन्नासवे शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये विश्‍वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करतांना मोठी खेळीचे पहिल्यापासूनच संकेत दिले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला जोरदार सुरूवात करून दिली. रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने फटकेबाजी केली. मात्र तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर विराट आणि श्रेयसने सूत्रे हाती घेतली.

विराट कोहलीने प्रारंभी शुभमनला साथ दिली. यानंतर मात्र त्याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने आज सचिनचा २००३च्या विश्‍वचषकातील सर्वाधीत ६७३ धावांचा विक्रम मोडीत काढला. यासोबत त्याने सचिनच्या एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांचा रॅकॉर्ड मोडत पन्नासावे शतक झळकावले आहे. ११३ चेंडूंमध्ये तब्बल ११७ धावा फटकावत तो बाद झाला. मात्र याआधी त्याने भारताला सुस्थितीत पोहचवले.

Protected Content