Home क्रीडा दिशा पाटील यांची राज्यस्तरीय रेस स्पर्धेसाठी निवड

दिशा पाटील यांची राज्यस्तरीय रेस स्पर्धेसाठी निवड

0
75

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मातोश्रीनगर येथील रहिवासी दिपक पाटील यांची कन्या दिशा पाटील यांची राज्यस्तरीय हर्डल आणि रिले रेस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आज सोमवार, दि. २५ जुलै रोजी व्यापारी रमेश चौधरी व शिवसेनेच्या माजी नगरसेविका अरुणा चौधरी यांची नात आणि स्व.दीपक चौधरी याची कन्या गरिमा चौधरी हिने ‘रिले’ या रेसमध्ये यश पाप्त केले आहे. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल मातोश्री नगर परिसर व धरणगाव शिवसेना शहर यांच्यातर्फे शिवसेना संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सत्कार केला. यावेळी धनराज पाटील, श्री.सोनार, यु.एस.बोरसे, संदीप पाटील, सचिन सोनवणे, शिवसेनेचे नगरसेवक भागवत चौधरी, अहमद पठाण, अॅड.शरद माळी, किरण अग्निहोत्री, राहुल रोकडे, ज्ञानेश्वर माळी, विलास पवार आदी. उपस्थित होते.


Protected Content

Play sound