निंबादेवी धरणासह ‘या’ चार ठिकाणी पर्यटनास बंदी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या निंबादेवी धरणासह चार ठिकाणी तहसीलदारांनी पर्यटनास मज्जाव करण्याचे निर्देश आज जारी केले आहेत.

यावल तालुक्याला लागूनच सातपुड्याची पर्वतराजी असून यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात अलीकडच्या काळात निंबादेवी धरण हे पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. येथे काल रविवारी अतिशय भयंकर अशी गर्दी झाली. यामुळे येथे अनेकांच्या जीवाला धोका असतांनाही लोक बेदरकारपणे वागत असल्याचे दिसून आले आहे. लोणावळा येथील भुशी डॅमप्रमाणे येथे पायर्‍या असल्याने अगदी महिला आणि मुलेसुध्दा येथे भिजण्याचा आनंद घेतात. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने यावलच्या तहसीलदारांनी आज निर्देश जारी करत निंबादेवी धरणावर पर्यटनास जाण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे.

या निर्देशांमध्ये निंबोदीवीच्या धरणासह मनुदेवीचा धबधबा, वड्री धरण आणि हरीपुरा धरण या चार ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हे निर्देश पुढील सूचना येईपर्यंत जारी करण्यात आल्याचे यावल तहसीलदारांनी नमूद केले आहे. यामुळे आता चारही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे.

Protected Content