महावितरणचा वीजग्राहकांना दिलासा

बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रकम भरण्यासाठी महावितरणकडून सहा मासिक हप्त्यांची सवलत देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीसह ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवेतील जादा रक्कमेचे ग्राहकाच्या वीजबिलात समायोजन करण्यात येत असल्याचा संदेश बिलासोबतच देण्यात येत आहे.

राज्य वीज नियामक आयोग विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव रकम आकारणी केली येते. दरवर्षी या सुरक्षा ठेव रकमेचे पुनर्गणना केली जाऊन, त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नव्याने सुरक्षा ठेव रक्कम निश्चिती केली जाते.
त्यात जमा सुरक्षा ठेवीसह वीजवापरानुसार निर्धारीत सुरक्षा ठेव फरकाची रक्कम सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिलप्रमाणे असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट, त्रैमासिक असल्यास सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदीनुसार एप्रिल महिन्यात वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले असले तरी बिलाची रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. तशी माहिती सुरक्षा ठेवीच्या स्वतंत्र बिलावर नमूद करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांचा वीज वापर कमी असेल आणि सुरक्षा ठेवीची रक्कम अधिक असल्यास सुरक्षा ठेवीची जादा रक्कम पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये समायोजित केले जाणार आहे. त्या नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Protected Content