कजगाव येथील विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथे सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे, गुणवंतजी सोनवणे चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कन्या शाळा व जि.प.प्राथमिक शाळा चमकवाडी या दोन्ही शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी  लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा व कजगाव येथील सासर असलेल्या सुचित्राताई  पाटील (राजपूत) चाळीसगाव, सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे सोमनाथ माळी चाळीसगाव,  सरपंच वैशाली पाटील, दिनेशभाऊ पाटील, राहुल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती कजगाव कन्या शाळेचे अध्यक्ष दत्तात्रय महाजन, उपाध्यक्ष अमृता पाटील, सदस्य नासिर खाटीक, आधार साठे, प्रविण सु.महाजन, केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक सोनवणे, केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका रंजना भांडारकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थिनींना स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने पालक, माता पालक उपस्थित होते. कन्याशाळेचे मुख्याध्यापक सुनिल महाजन यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद प्रविण महाजन, ऐश्वर्या राजपूत, सुरेखा माळी व धर्मराज पाटील यांनी प्रयत्न केले.

 

Protected Content