विदयालयामध्ये मुलांचे उस्फुर्त स्वागत

pratham din mulacha

पाचोरा प्रतिनिधी । आज (17 जून) रोजी सर्वत्र विदयालयामध्ये वेगवेगळया प्रकारे मुलांचे स्वागत करण्यात आले आहे. मुलांना शाळेचा प्रथम दिवस कायम स्वरुपी स्मरणात राहावा, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयामध्ये निरनिराळया पध्दतीने मुलांचे स्वागत व भेटवस्तू तसेच खाऊ देण्यात आला आहे.

जसे सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात नूतन शैक्षणिक वर्ष प्रवेश उत्सव जल्लोषात करुन, विद्यार्थ्यांना मिष्ठान्न पुरवण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच जागृति विद्यालयात प्रथम दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शाळात प्रथम प्रवेश उत्सवानिमित्त पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सकाळी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच  माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात आज ता १७ रोजी शाळेच्या प्रथम दिवशी विध्यार्थीनिंचे सवाद्य उस्फुर्त स्वागत करण्यात आले. समाजसेवक व पत्रकार अनिल येवले यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या प्रथम दिवशी आलेल्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत झाले. यावेळी विद्यार्थिनींना पाठयपुस्तके वाटप करण्यात आली. प्राचार्य संजय पवार यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.आर बी चव्हाण, प्रा.के टी भारुळे, प्रा.प्रतिभा परदेशी, प्रा.अंकिता शेळके, प्रा.संगीता राजपूत, प्रा.प्रतिभा पाटील, मायाताई सूर्यवंशी, शिवाजी शिंदे, अंबालाल पवार, निवृत्ती बाविस्कर, अनिल पवार, सुवर्णसिंग राजपूत, आदी उपस्थित होते.

Protected Content