महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल निवडणूक पारदर्शक घ्या – राहुल राठोड  

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची निवडणूक रजिस्टर पोस्ट मार्फत पारदर्शकपणे घेण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे धुळे जिल्हा संघटक व राष्ट्रीय बंजारा परिसदचे गुजरात राज्य संघटक राहुल राठोड यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनची आढावा बैठक नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. त्यावेळी बोलतांना राठोड म्हणाले की, राज्य फार्मसी कौन्सिलची या अगोदरची निवडणूक सन – २०११ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीचा सर्वे करता ३० वर्षांपासून विविध क्षेत्रातील रजिस्टर असलेले फार्मासिस्ट यांच्यापर्यंत निवडणुकीचा बैलेट पेपर पोचलेला नाही. असं जुना फार्मासिस्टचा माध्यमातून सर्वेमध्ये सांगण्यात आले व जुन्या फार्मासिस्टला निवडणूक बद्दल पण काही माहिती नाही. पण या वेळेस होणारी निवडणुक पूर्ण पारदर्शकपणे होण्यासाठी लवकरच संघटनेमार्फत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी. सी. आय.) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री व निवडणूक अधिकारी या सर्वांना पत्र देऊन निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

पत्रव्यवहार करूनही गैरव्यवहार आढळल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सर्व फार्मासिस्ट चक्काजाम आंदोलन करू असा इशारा संघटनेमार्फत प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे , प्रदेश उपाध्यक्ष सचिन गुलदगड, शामसुंदर शेट्टै, प्रदेश सचिव रोहित वाघ, प्रदेश सहसचिव महादेव मुंडे, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण, प्रदेश कोषाध्यक्ष राम घोटकार, ज्ञानेश्वर पायघन, राज्य कार्यकारणी सदस्य प्राचार्य बालाजी नरवटे सागर, मराठवाडा विभाग सचिव सागर शिंदे, नाशिक विभाग अध्यक्ष सुशिल पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रदीप बोडखे, विदर्भ प्रमुख योगेश मुंढे यांच्यामार्फत देण्यात आला आहे.

जून – २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपर सर्व रजिस्टर फार्मासिस्टच्या अधिकृत पत्त्यावर पोचले तर संकल्प पॅनल चा विजय नक्कीच होईल असे मत संकल्प पॅनलच्या उमेदवारांनी व पॅनल प्रमुख यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content