Home क्राईम महिलेस विनयभंगासह मारहाण : दोघे अटकेत

महिलेस विनयभंगासह मारहाण : दोघे अटकेत

0
70


भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीसात तक्रार दिल्याचा राग आल्याने दोघांनी एका महिलेचा विनयभंग करून तिच्यासह तिच्या दिराला मारहाण करण्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, फिर्यादी महिलेचे मामे दिर यांनी ६ मार्चला संजय अशोक बाविस्कर, योगेश सुभाष पवार (रा. कृष्णा नगर, भुसावळ) व कृष्णा सुतार (रा. कोलते गल्ली, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून संशयीत बाणाईत व पवार यांनी शनिवारी रात्री महिलेस शिविगाळ करत महिलेस मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी महिलेचे दीर आल्यानंतर त्यांनाही संशयितांनी मारहाण करून शिविगाळ केली.

जामनेर रोडवरील भिरूड हॉस्पिटलमागील कृष्णा नगरात ही घटना घडली. या प्रकरणी संशयीत धनंजय उर्फ गोलू दत्तू बाणाईत व तुषार अशोक पवार यांच्याविरोधात ऍट्रासिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.


Protected Content

Play sound