जळगावात आयपीएलवर सट्टा : तिघांवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या आयपीएल या स्पर्धेबाबत सट्टा घेणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा सुरू आहे. विविध ठिकाणी आयपीएल स्पर्धेबाबत सट्टा खेळला जात असल्याच्या घटना आधी देखील मोठ्या प्रमाणात उघड झालेल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर, जळगावातही आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळालेली होती. या अनुषंगाने त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून फातेमा नगरात छापा टाकला.

या छाप्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ मोबाइल, ४० हजार ६०० रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी इम्रान अमीन खान (वय ४०, रा. चिखली, ह. मु. फातेमानगर), वसीम सय्यद कमरोद्दीन (वय ३८), जावेद नबी शेख (वय ३०, रा. फातेमानगर) यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या या पथकात जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांचा समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक इम्रान सय्यद तपास करीत आहेत.

Protected Content