वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील रहीपुरी गावाजवळील रोडवरून विनापरवाना वाळूची वाहतूक करतांना मेहुणबारे पोलीसांनी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले आहे. याप्रकरणी मध्यरात्री ३ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील रहीपुरी गावातून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मेहुणबारे पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजता सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर आढळून आले. याबाबत चालक बाळकृष्ण संजय पाटील वय २२ रा. भोसर बुद्रुक ता. चाळीसगाव याने वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी वाळूचे भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालका बाळकृष्ण पाटील याच्या विरोधात मेहुणबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश मांडोळे हे करीत आहे.

Protected Content