जळगाव प्रतिनिधी । वाशिम येथील स्थानिक गुन्हे शाखेने 17 दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांनी काही दुचाकी जळगावातून चोरल्या असून शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यात गुन्हे शोथ पथकाने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याने गोलाणी मार्केट येथून चोरलेली दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी सुरेश रघुनाथ पाटील वय 54 हे 6 ऑगस्ट 2018 रोजी गोलाणी मार्केेटमध्ये खाजगी कामासाठी आले होते. यादरम्यान त्यांची गोलाण मार्केटमधील हनुमान मंदिराजवळून त्यांची 30 हजार रुपये किमतीची (क्र. एम.एच.19, बी.पी. 4390) ही चोरी झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे हे करीत आहेत. शिरसाळे यांना वाशिम येथे दुचाकीचोरांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरलेल्या 17 पैकी 6 दुचाकी जळगावातून चोरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गणेश शिरसाळे, प्रनेश ठाकूर, निलेश पाटील, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने वाशिम स्थानिक गुन्ह शाखेच्या ताब्यातून दुचाकी चोर शिवाजी रामदास राठोड (वय 50 रा. सिव्हील लाईन, वाशिम) यास ताब्यात घेतले. या संशयित व दुचाकीसह पथक मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाले. राठोडने त्याच्या साथीदारांसह शहरातील इतर ठिकाणांहून अशा सहा दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली आहे.