मिरवणुकीवर दगडफेक: 20 जण अटकेत; तीन पिस्तूलांसह पाच तलवारी जप्त

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हनुमान जयंतीनिमित्त शनिवार, दि.16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली असून तीन पिस्तूलांसह पाच तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत.

यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या हिंसाचार प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली त्यावेळी अन्सार नावाच्या एका व्यक्तीने चार-पाच साथीदारांसह मिरवणुकीत सामील लोकांसोबत वाद घालू लागला. यानंतर हा वाद वाढत गेला आणि दगडफेक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या 20 आरोपींपैकी चार आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. अस्लम यालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांची वयासह नावे –


  1. जाहिद  (वय, 20)

    2. अन्सार (वय,  35)

    3. शहजाद  (वय,  33)

    4. मुख्तार अली  (वय,  28)

    5. मोहम्मद अली  (वय,  18)

    6. अमीर  (वय, 19)

    7. अक्सर  (वय, 26)

    8. नूर आलम  (वय,  28)

    9. मोहम्मद अस्लम (वय, 21)

    10. झाकीर (वय, 22)

    11. अक्रम (वय,  22)

    12. इम्तियाज (वय, 29)

    13. मोहम्मद अली  (वय, 27)

    14. अहिर (वय, 35)

    15. शेख सौरभ (वय, 42)

    16. सूरज (वय, 21)

    17. नीरज (वय, 19)

    18. सुकेन (वय, 45)

    19. सुरेश  (वय, 43)

    20. सुजित सरकार (वय , 38)

Protected Content