आता गुजरातकडे लक्ष – पंतप्रधान सोमवारपासून गुजरात दौऱ्यावर

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकित विजय मिळविल्यानंतर भाजपाने आता सर्व लक्ष गुजरातकडे दिले असून गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.१८ एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पुढील काही दिवसांत गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. भाजपकडून या निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि.१८ ते २० एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.१८ एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२० तारखेपर्यंत ते गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान बनासकाठामध्ये तीन लाख महिलांना संबोधित करतील. पंतप्रधान दि.१८  एप्रिलला  सायंकाळी साडेपाच वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देतील. दि.१९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बनासकाठामधील गांधीनगर हेलिपॅड ते बनासदेरी या वेगळ्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करतील. तसेच तिथे ते महिला, शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Protected Content