मानव सेवा विद्यालयातर्फे ‘स्टडी फ्रॉम होम’ अंतर्गत विविध उपक्रम

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. या सुट्टीच्या काळात मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून मानव सेवा विद्यालयातील शिक्षकांकडून स्टडी फ्रॉम होम उपक्रम राबविण्यात येत आहे. याला विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

लॉक डाउनच्या सुट्टीच्या काळात ही विद्यार्थ्यांना होमवर्क नियमितपणे सुरू आहे. त्यांचे फोटो सुध्दा पालकांकडून नियमितपणे मागितले जात आहे. इयत्ता १ ली ते १० वी चे प्रत्येक वर्गशिक्षक व विषयशिक्षकांनी पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यास विषयी चर्चा करत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने नियमितपणे अभ्यास करून घेत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी युट्युब लिंक पाठवली जात आहे. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना नाविण्यपुर्ण उपक्रम दिले जात आहे जसे की, दिनविशेष, छान छान गोष्टी, सुविचार, चित्र गणित कोडे , शुद्धलेखन, समानार्थी शब्द विरूध्द अर्थी शब्द आदी प्रकल्प देण्यात येत आहेत. पेपरांमधुन माहिती गोळा करून कात्रण वही तयार करत आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी माहिती मिळावी यासाठी इतिहासिक नाटक पाहण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. लहान कामात आईवडीलांना मदत कशी करावी हे सुध्दा सांगितले जाते. पालकांशी व विद्यार्थ्यांशी व्हिडिओ काॅल करून त्यांच्याशी संवाद साधून अभ्यासक्रमातील ज्या अडचणी समजून घेत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करीत आहे. मुले ही आनंदाने पाढे पाठांतर, कविता, अभ्यास करत आहे. दहावी वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक वर्गशिक्षक पालकांशी फोन करून कोरोनाविषयी माहिती सांगून मुलांची व स्वतः ची काळजी घेण्यास सांगत आहे. स्वच्छतेविषयी, कोरोनाविषयी जनजागृती करत आहे. याउपक्रमास संस्थेचे अध्यक्ष डाॅ. आर. एस. डाकलिया यांचे मोलाचे मार्गदर्शन करून कौतुक केले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील , माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Protected Content