आधुनीक कला प्रकारांना सर्वतोपरी सहाय्य-अशोकभाऊ जैन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाने आजवर विविध कला प्रकारांना पाठबळ दिले असून याच प्रकारे आता स्मार्टफोनसह अन्य आधुनिक उपकरणांच्या माध्यमातील कलांनाही सर्वतोपरी सहाय्य केले जाईल अशी ग्वाही आज अशोकभाऊ जैन यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंड न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते.

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊंचे उद्यान येथे इ-पीक चित्र प्रदर्शन सुरू झाले आहे. यात स्मार्टफोनच्या माध्यमातून काढण्यात आलेली छायाचित्रे प्रदर्शीत करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला आज सायंकाळी अशोकभाऊ जैन यांनी भेट दिली. यानंतर लाईव्ह ट्रेंडस् न्यूजशी साधलेल्या संवादातून त्यांनी आधुनीक कला प्रकारांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की, आज स्मार्टफोनमुळे मानवाच्या हाती अतिशय पॉवरफुल साधन आले आहे. याच्या मदतीने अगदी ४० हजार फुटांच्या वर अथवा १० हजार फुटांच्या खालीदेखील छायाचित्रे काढता येत आहेत. यात सर्वसामान्य नागरिक अतिशय उत्तमोत्तम प्रतिमा घेत आहेत. यातील निवडक छायाचित्रे ही ई-पीक प्रदर्शनात प्रदर्शीत करण्यात आलेली आहेत. याच प्रकारे भविष्यातही डिजीटल आर्टसाठी हवी ती मदत करण्यास आम्ही तत्पर राहणार असल्याची ग्वाही अशोकभाऊ जैन यांनी दिली.

पहा- डिजीटल आर्टबाबत अशोकभाऊ जैन यांचे विचार.

Add Comment

Protected Content