प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत महिलेची ९४ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । निती आयोगाचे बनावट कागदपत्रे दाखवून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे आमिष दाखवत एका व्यवसायिक महिलेला तब्बल ९४ लाख १४ हजार ८५३ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, योगीता उमेश मालवी (वय-३८) रा. दांडेकर नगर पिंप्राळा हे खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. व्यवसाय करत असल्याने त्यांची अविनाश अर्जून कडमकर रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांच्याशी डिसेंबर २०१८ मध्ये ओळख झाली. कडमकर यांनी योगीत मालवी यांना निती आयोगाचे बनावट कागदपत्र दाखवून व बनावट नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार मालवी यांना बनावट खाते क्रमांक पाठविले. अविनाश अर्जून कडमकर, प्रिती विनायक खवले, प्रमिला अर्जून कडमकर, कांचन दादाभाऊ दंगे, शिवराम आप्पाजी जासूद, संगिता शिवराम जासूद, अर्जून माधवराव सर्व रा. देहठेणे ता. पारनेर जि. नगर यांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्याचे आमिष दाखवून योगीता मालवी यांच्याकडून वेळोवेळी १५ जानेवारीपर्यंत बनावट खात्यावर सुमारे ९४ लाख १४ हजार ८५३ रूपये मागवून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीत मालवी यांनी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात वरील सात जणांसह इतर अनोळखी ३ जण असे एकुण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संदीप पाटील करीत आहे.

Protected Content