पत्रकार जीवन चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार

चाळीसगाव प्रतिनिधी | लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी जीवन चव्हाण यांना राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाजातर्फे समाजभूषण पुरस्काराने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील मेहुणबारे येथे शनिवारी सायंकाळी राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाजातर्फे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी जीवन चव्हाण यांना समाजभूषण पुरस्काराने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. श्री. चव्हाण यांनी संवेदनशील पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांमधील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

दरम्यान, जीवन चव्हाण यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातल्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवारातर्फे त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!