आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने चाळीसगावात विक्रमी लसीकरण

चाळीसगाव प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने शहरासह तालुक्यात विक्रमी लसीकरण करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या असून चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दि.४ सप्टेंबर २०२१्| रोजी एकाच दिवसात एकाच ठिकाणी घेतलेल्या जम्बो लसीकरण शिबिरात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला गेला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणापासून वंचित असणार्‍या हजारो नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाल्याने चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी हे शिबीर बूस्टर डोसच ठरल्याची प्रतिक्रिया शहरातून येत होती.विशेष म्हणजे अवघ्या काही तासात या शिबिराचे नियोजन करण्यात आले असूनदेखील दिवसभरात आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत स्वतः आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व युवा मोर्चा चे पदाधिकारी – कार्यकर्ते, शिवनेरी फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी घेतलेल्या मेहनतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिबीर यशस्वी करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण हेदेखील पूर्णवेळ शिबिराच्या ठिकाणी थांबत लसीकरणावर लक्ष ठेवून होते व येणार्‍या नागरिकांची विचारपूस करत होते. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकासाठी पाण्याची आणि ग्लुकोज बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर जम्बो कोरोना लसीकरण शिबिर बंदिस्त ठिकाणी घ्यावे लागणार होते. तेली समाज मंडळाच्या दातृत्वाने एम.जी.नगर येथील तेली समाज मंगल कार्यलय लसीकरण शिबिरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तेली समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी देखील शिबिरात पूर्णवेळ थांबत नियोजनात सहभाग घेतला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!