शिक्षक दिनानिमित्त शहरात ‘गौरव गुरुजनांचा’ हा कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरदार वल्लभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व युवा विकास फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं ‘गौरव गुरुजनांचा’ हा कार्यक्रम शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे संपन्न झाला.

याप्रसंगी अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी, प्रमुख पाहुणे आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार उल्हास पाटील, महापौर जयश्री महाजन, शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाब वाघ, संस्थेचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, लोकनियुक्त धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोदावरी एम.बी.ए कॉलेजचे प्राचार्य प्रशांत वारके, धनाजी नारा महाविद्यालय फैजपूरचे प्राचार्य पी.आर.चौधरी, आय.एम.ए. जळगावच्या माजी अध्यक्ष स्नेहल फेगडे, धनाजी नाना महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, पंकज महाविद्यालय चोपडाचे प्राचार्य आर.आर.अत्तरदे, धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष विपुल पारेख, सचिव रवींद्र वाणी, व्ही. झेड. पाटील, अशोक मदाने, ग. स. सोसायटीचे संचालक महेश पाटील, योगेश इंगळे, महेंद्र गांधी, संजय जैन, सुहास वाणी, हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक सादर करत विष्णू भंगाळे यांनी संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती सांगून ‘शिक्षक हा समाजासाठी किती महत्त्वाचा घटक आहे.’ याविषयी माहिती सांगितली. डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मनोगतात ‘आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं ? कसं जगावं ? त्याचा धडा शिकवणारे शिक्षक ही आपल्या कर्तव्याची भूमिका बजावतात. जीवनामध्ये अपूर्णाला पूर्णत्व देणारे नैतिक मूल्यांची शिकवणूक करणारे शिक्षक एक प्रकारचे क्रांतिकारक असल्या’चे गौरव उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी, “शिक्षकाला समाजात अनन्य साधारण महत्व असून राष्ट्र उभारणीचे कार्य हा शिक्षक करत असतो. शिक्षकांना खूप आव्हानांना सामोरे जावं लागतं. समाजात क्रांती घडवण्याचं कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं.” असं सांगत ‘शिक्षकाने नवीन टेक्नॉलॉजी अवलंबली तर शिक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता वाढेल’ असं त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी विशेष सत्कार करण्यात आले यात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कार्यक्षेत्रातील प्राचार्य परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. धनाजी नाना महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांचा विद्यापीठाकडून दिला जाणारा ‘बेस्ट प्राचार्य 2022 पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

 

पंकज महाविद्यालय चोपडाचे प्राचार्य आर.आर.अत्तरदे यांचा आणि धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ.राकेश चौधरी यांचा प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे व गणेश लोडते यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल फेगडे यांनी केलं. याप्रसंगी सुरेश अत्तरडे, महेंद्र पाटील, राजेश वारके, निलेश चौधरी, चेतन पाटील, विकी काळे, शुभम निकम, अमोल मोरे, सचिन पाटील, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, तुषार पाटील, हर्षल चौधरी, विजय नारखेडे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content