मनवेल आश्रमशाळेत आरोग्य तपासणी मोहीम

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील उज्वल शिक्षण संस्था अमरावती संचलित कै. व्ही. व्ही. तांबट अनुदानित आश्रमशाळेत ७७ विद्यार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली.

 

यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सिकलसेल आजारांविषयी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सिकलसेल संसर्गजन्य आजार नसून तो अनुवंशी ( पिढ्यानपिढी ) आजार आहे. तसेच विवाह पूर्वी सिकलसेल आजाराची तपासणी करणे, पती पत्नी दोघेही एस -ए एस असल्यास बाळाची गर्भजल तपासणी करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. एस = ए एस वक्ती असल्यास सतत डॉक्टरच्या सल्याने औषध उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. रक्ताची आवश्यकता भासल्यास सिकल सेल व्क्तीना मोफत सुविधा शासनाकडून दिली जाते. या पीडित वक्तीला शासनाकडून १००० रु महिना मदत दिली जाते. अश्या प्रकारे माहिती साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत शिरसाड आरोग्य उपकेद्र मधील सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आस्मा परवीन नमुउद्दीन शेख यांनी दिली. यावेळी कै .व्ही व्ही तांबट अनुदानीत आश्रम शाळेतील अधिक्षक वंसत पाटील, सरीता तडवी , मुख्यध्यापक संजय अलोणे, सचिन पाटील शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आशा स्वंयमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, ज्योती मोरे यांनी कामकाज पहिले.

Protected Content