समता नगरात शासकीय आयुर्वेद रुग्णालयातर्फे सर्व रोगनिदान शिबीर

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आशितोष बहुउद्देशीय प्रतिष्ठान, जनकल्याण युवा फाउंडेशन आणि शिवशक्ती मानव सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आयुर्वेद रुग्णालय यांच्या सहकार्याने सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

समता नगर येथील सर्व रोगनिदान शिबिरात मधुमेह, दमा, खोकला, पँरलिसिस,मूळव्याध, मणक्याचे आजार इ. आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. सर्वांना मोफत औषधींचे वाटप देखील करण्यात आले. या शिबिरात रुग्ण तपासणी शासकीय आयुर्वेद रुग्णालय येथील वैद्य शर्मिली सूर्यवंशी, वैद्य स्वाती गायकवाड, वैद्य राजीव टारपे, वैद्य विनायक पाचे , वैदही जोशी आणि सीमा साखरे, परिचारिका हर्षली तायडे आणि फार्मासिस्ट धिरज राठोड तसेच लॅब टेक्निशियन किसन पावरा उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी विकी कलाल, मुकेश शिंदे, मनोज सोनार, बाळा सोनार, किशोर जाधव, गौरव लक्ष्मण सोनवणे आदींनी कामकाज पाहिले.

Protected Content