अजून किती बळी घेणार अरूंद राष्ट्रीय महामार्ग ?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराजवळच्या दूरदर्शन टॉवरजवळ अपघातात जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अतिशय अरूंद असल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. याच अरूंद रस्त्याने दोघा युवकांना बळी घेतला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगावातील परवेज निसार खाटीक (वय २२, लक्ष्मीनगर, जळगाव ) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, उस्मानिया पार्क ) हे भुसावळ येथे कामानिमित्त गेले होते. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, तरसोद फाट्यापासून ते हॉटेल कमल पॅरेडाईज पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय अरूंद असून याच्या साईडपट्टयांचे काम देखील अजूनही प्रलंबीत असेच आहे. यातच टिव्ही टॉवरच्या समोर रस्ता अतिशय अरूंद असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. याच प्रकारे या अरूंद रस्त्याने आज झालेल्या अपघातात दोन तरूणांचा बळी घेतला आहे. आता तरी या रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करावे अशी अपेक्षा आहे. अन्यथा येथील अरूंद मार्ग अजून अनेक बळी घेऊ शकतो अशी भिती आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: