कारागृहातून रजेवर असलेल्या फरार आरोपीला अटक

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैठण कारागृहात दाखल असलेला कैदी रजेवर बाहेर पडल्यानंतर फरार झाला होता. या कैद्याला सोमवार, ५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील शिवाजीनगर येथून अटक केली आहे. शेख इसा शेख पिरण (वय-४०) असे अटकेतील कैदीचे नाव आहे.

कोरोना काळात कारागृहातील कैद्यांना अभीवचन रजेवर सोडण्यात आले होते. यात पैठण कारागृहातील दाखल खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी शेख इसा शेख पिरण हा अभिवचन रजेवर बाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा कारागृहात परतला नाही. या कैद्याचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. फरार असलेला हा कैदी जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे गाड्यावर काम करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, विजय पाटील यांच्या पथकाने त्यास सोमवारी अटक केली. त्यास पुढील कारवाई करता जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Protected Content