भाऊसाहेब राऊत विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाऊसाहेब राऊत विद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालयाचे प्रा.मोरेश्वर सोनार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे यांचेसह पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग, श्रीमती प्रमोदिनी बाविस्कर, अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय राजेश जाधव यांनी करून दिला. इयता १० वी च्या विद्यार्थिनी अश्विनी सपकाळे, डिंपल सपकाळे, दैवशाला दांडगे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी शिक्षकदिनानिमित्त संस्थेच्या वतीने विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर वृंदाचा उपरणे, श्रीफळ व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांपैकी संदेश आढाळे, दिव्या महाले, अविनाश कांडेलकर, लखन जाधव, दैवशाला दांडगे, अश्विनी सपकाळे यांनी भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर माहिती दिली. शिक्षकांतर्फे सुवर्णसिंग राजपूत यांनी भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्र आपल्या मनोगतातून प्रकट केले.

प्रमुख अतिथी प्रा मोरेश्वर सोनार यांनी ‘शिक्षकदिन आज का साजरा केला जातो’ यासह आजच्या दिनाचे सविस्तर महत्व विशद केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सर्वपल्ली डॉ राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान यावर सविस्तर माहिती दिली. आज विद्यालयाचे सर्व कामकाज, शिक्षकांची भूमिका, वर्गात शिकविणे या भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख योगराज सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद कोळी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Protected Content