यावल : तिसऱ्या दिवशी उपोषण सुरु

यावल प्रतिनिधी । येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प जिल्हा कार्यालयातील भ्रष्टाचारात सामील असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी मान्य न झाल्याने आज तिसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरु आहे. 

 

भ्रष्टाचारारातील सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरीत निलंबनाची कार्यवाही  झाल्या शिवाय उपोषण सोडणार नाही अशी ठाम भुमिका उपोषणकर्ते यांनी घेतल्याने आज तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.  या आमरण उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ला पाठींबा आहे . दरम्यान आज भाजपाचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणा स्थळाला भेट दिली व त्यांना त्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या भ्रष्ठाचारविरोधी लढयास आपला पाठींबा दिला  आहे .

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहातील पाणी पुरवठा व देयकांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पाणी पुरवठादारांनी संगनमताने आदिवासीच्या निधीचा अपहार केला आहे. याची चौकशी करून आदिवासींना न्याय मिळावा यासाठी आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदिवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहात सन २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू पाणी पुरवठ्याच्या बिलांमध्ये खाडखोड केले असून बिलांवर शिक्का व स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. तसेच बिलांवर आणि बिल बुकावर नंबर हाताने टाकलेले आहेत. तसेच चार देयकांची रक्कम ही कर्मचारी गृहपाल डी.बी.पाटील यांचे नावे तर कधी कर्मचारी म्हणून तर कधी देयकात विद्यार्थी म्हणून धनादेशाद्वारे जमा केलेली दिसते. एकलव्य महिला आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटात चिंचोली यांना सन २०१८-१९ या वर्षांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिलेली आहे. परंतू संबंधित पुरवठ्याचे पाणी पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी तपासणी अहवालही घेतलेला नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबरही नाही. याप्रमाणे निधीचा अपहार केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. पंरतू अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने आज आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदीवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी  जिल्हाध्यक्ष करण हरदास सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत अहिरे, टंट्या भिल ब्रिगेडचे महेंद्र मोरे, कृष्णा मोरे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. दरम्यान आज आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असुन ,  आदीवासी एकात्मीक विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी आज उपोषणाच्या ठीकाणी भेट दिली व उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली मात्र तोडगा निघु शकला नाही, यावेळी उपोषणकर्त्यांशी बोलतांना प्रकल्प अधिकारी यांनी सांगीतले की या सर्व प्रकरणाचा तपास प्रथम जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता नंतर या  कार्यालयाकडुन नाशिक आयुक्तांकडे सोपविण्यात आला असल्याचे सांगुन आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातुन चौकशीचे काम पुर्ण झाले असून आपल्याला त्या चौकशी अहवालानंतर दिलेल्या निकालाची वाट बघावी लागेल असे प्रकल्प अधिकारी सोनवणे यांनी सांगीतले असुन , दरम्यान या भ्रष्ठाचार संदर्भात ज्यांच्या विरूध्द तक्रारी आहे त्या सर्वांच्या प्रशासकीय बदल्या त्या ठीकाणाहुन करण्यात आल्या असल्याची माहीती प्रकल्प अधिकारी यांनी दिली. असे असतांना ही मात्र चर्चेतुन उपोषण सुटण्याचा मार्ग निघाला नाही . याबाबत यावल येथील भाजपाचे पदधिकारी तथा युवा नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांनी आज दि. १५ ऑगस्ट आमरण उपोषण करणाऱ्या आदिवासी बांधवांची उपोषणास्थळी भेट देवुन सविस्तर माहिती जाणुन घेत उपोषणास आपला पाठींबा जाहीर केला.  या भ्रष्ठाचारा प्रकरणा संदर्भातील माहीती राज्याचे विरोधी पक्षनेते  देवेन्द्र फडणवीस , राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री ना.के. सी. पाडवी , रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे आदींना पत्र पाठवुन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी करणार असल्याचे डॉ. कुंदन फेगडे यांनी सांगितले.  यावेळी त्यांच्या सोबत रितेश बारी, भुषण फेगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आज उपोषणाच्या स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले व राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष एम बी तडवी , मनसेचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर समवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही भेट दिली व उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले

 

Protected Content