गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व ग्रामसेवकात समन्वय आवश्यक – आ. किशोर पाटील

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या केवळ तक्रारीच न करता आपल्या गावाचा विकास करुन घेण्यासाठी तर ग्रामसेवकाने ही पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेतल्यास गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मत  आ.  किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

पाचोरा पंचायत समितीची आढावा बैठक आ. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात आ. पाटील यांनी गावाच्या सर्वांगिक विकासासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्यात समन्वय असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी  जर ग्रामसेवक विविध वसुली व गावाच्या विकासात अडसर ठरत असेल तर त्यांची गैर केली जाणार नाही  असा सज्जड दम देखील अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी गटविकास अधिकारी अतुल पाटील, सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भालेराव, नरेंद्र चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, उपस्थित होते.

पाचोरा येथील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये आज दि. २९ आॅगस्ट रोजी पाचोरा पंचायत समिती आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रावसाहेब पाटील, मधुकर काटे, सूभाष पाटील, धनराज विसपुते, विनोद पाटील यांनी विविध विभागाच्या समस्यांवर लक्ष वेधले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी ग्रामसेवकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, खरी तक्रार असेल तरच ती कळवावी, कामात कसुराही केल्यास त्यांची गैर केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी समन्वयक कैलास पाटील, विस्तार अधिकारी, दिलीप सुरवाडे, सुनिल पाटील, सुनील पाटील, कृषी विस्तार अधिकारी, राजेंद्र गढरी, ए. पी. मोरे, ग्रामसेवक नंदुरबार गोराडे, नंदकुमार पाटील, बी. एस. पाटील, सतीष सत्रे, विकास पाटील, एल. एम. पाटील, वासुदेव पाटील, नितीन बोरसे सह विविध गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते,

Protected Content