केर्‍हाळ्यात विकास कामांच्या श्रेयवादावरुन जुंपली

kerhala nete

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केर्‍हाळा बुद्रुक येथील विकास कामांच्या श्रेयवादा वरुन सरपंच राहुल पाटील व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यात चांगलीच जुंपली असल्याने याबाबत एकच चर्चा सुरू आहे.

केर्‍हाळा येथील सरपंच राहुल पाटील यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांचे पती तथा भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी रावेर येथे शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परीषद घेतली यात ते म्हणाले की, केर्‍हाळा गावात ग्राम पंचायत समोर दहा लाखाचे काम मंजूर होते परंतु तेथे आधीच ग्राम पंचायतने आधीच करून घेतल्याने तो निधी इतर ठिकाणी वार्ड क्रमांक दोन मध्ये वळवण्यात आला. तसेच ज्ञानेश्‍वर नगर मध्ये देखील पेव्हर ब्लॉक तिन लाखचा निधी आम्हीच मंजूर केला असुन सरपंच राहुल पाटील हे दिशाभूल करत असल्याची टीका अमोल पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये केली.

तर दुसरीकडे केर्‍हाळा बुद्रुक येथील सरपंच राहूल पाटील यांनी अमोल पाटील यांच्यावर आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, केर्‍हाळा गावात काही महिन्यांपूर्वी अमोल पाटील यांनी एका सभेत झालेले विकास कामे जिल्हा परिषद निधीतून केल्याचा दावा केला. परंतु ही सर्व कामे ग्राम पंचायतने १४ वित्त आयोगातुन केले आहे या मध्ये ग्राम पंचायत समोर, ज्ञानेश्‍वर नगर मध्ये पेव्हर ब्लॉक बसवीणे जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे ही कामे सभे मध्ये लोकांना दाखविली आहेत. परंतु ही कामे ग्राम पंचायतीने केलेली आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी जनतेसमोर मांडण्याचे आव्हान राहुल पाटील यांनी दिले आहे.

Add Comment

Protected Content