रावेर येथे विविध मागण्यासाठी आदिवासी बांधवांचा मोर्चा (व्हिडीओ)

pratibha sinde

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी बांधवांचे वनदावे, आरोग्य आणि शिक्षण विषयक विविध मागण्यांसाठी लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सवाद्य काढण्यात आला. आदीवासी समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी तालुका प्रशासनाशी चर्चा सुरू होती.

या आहेत आदीवासी बांधवांच्या मागण्या
याबाबत अधिक वृत्त असे की, रावेर तालुक्यातील वन विभागाच्या जागेवर शेती करण्यासाठी दाखल असलेल्या वन दावे त्वरित मंजूर करावेत. शेतीच्या जमिनीवरील पिके नष्ट करू नये. अयोग्य विषयक आणि शिक्षण संदर्भातील प्रश्न मार्गी काढण्यासाठी प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छोरिया मार्केट येथून सदर मोर्चा काढण्यात आला. रस्त्याने आदिवासी संगीत वाद्यआणि घोषणा देत तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर बैठकीत करण्यात आले. याठिकाणी 84 वर्षीय वृद्ध आजीने आदिवासी गीत सादर केले. याठिकाणी प्रतिभाताई शिंदे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आज जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आमचा आवाज गेला पाहिजे. शासनाचा नवीन निर्णय अन्यायकारक असून मोटारसायकल आणि टी.व्ही. असल्यावर रेशनधान्य न देण्याचा निर्णय रद्द करावा. अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देखील कापली आहे. रामदेव बाबा यांना 400 हेकटर जमीन दिली पण आदीवासी बांधवांचे हक्क डावलून पांढर पैश्यांना दिली जातेय. शासन वन कायदा बळकट करत असून वन हक्क कायदा कमकुवत करण्याचा घाट रचत आहेत. आमचा राग स्थानिक अधिकाऱ्यांवर नाही वरच्या प्रशासनावर आहे. आधीच आस्मानी संकटाने आदिवासी त्रस्त आहेत. शासनाच्या सुलतानी कारभाराने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. याठिकाणी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, वन्य जीव सहा वन संरक्षक श्री भवर, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन, डॉ स्वप्नजा पाटील, डॉ सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय तायडे, चंदू पवार, विस्तार अधिकारी श्री महाले, श्री सोनवणे यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प यावल, तालुका वैद्यकीय अधिकारी, शालेय पोषण विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रतिभा ताई शिंदे यांच्यासह भरत बारेला, रमेश बारेला, गाठू बारेला, सचिन धांडे, रमेश बारेला, इरफान तडवी, हिरालाल पावरा, दिलरुबाब तडवी, सिकंदर तडवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तहसीलदार यांचे कौतुक
रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांचे विषयी बोलताना प्रतिभाताई शिंदे यांनी त्यांच्या तळोदा येथील कामाचा संदर्भ देऊन दुष्काळी निधी वितरणात राज्यात त्यांचा प्रथम क्रमांक आहे त्यांच्या परिश्रमाचे कौतुक त्यांनी केले.

Protected Content