छोटु भोई यांच्याविरुद्ध बदनामी थांबवावी; अन्यथा आंदोलन – भोई समाजाचा पवित्रा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोई समाजाचे उदयन्मुख नेतृत्व छोटू भोई यांना राजकीय विरोध म्हणून राजकीय षडयंत्र करीत खोटे गुन्ह्यात अडकवून राजकीय जीवनातून संपवण्याचा कट राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. असल्याचा उल्लेख करत निषेधार्थ भोई समाज बांधवांतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते छोटुभाऊ बाबुराव भोई हे गेल्या वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत असून १० वर्षापासून ते शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. वंचीत घटकांना जवळ करून त्यांच्यासाठी नेहमी धडपडत असतात तसेच ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून भोई समाजाचे तालुकाध्यक्ष म्हणून समाजकार्य सुध्दा कार्य करीत आहे. त्यांच्या बाबतीत आणि एकूणच कार्यपध्दतीबाबत कुणाची काहीएक तक्रार नसतांना केवळ राजकीय आकसातून माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे सातत्याने दबावतंत्र वापरून त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचून छोटू  भोई व समाज बांधव यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे नोंदवून त्यांना बदनाम करीत असल्याचा उल्लेख करत छोटु भोई यांच्याविरुद्ध माजी मंत्री व विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी चालविलेल्या षड्यंत्राची दखल घेऊन पर्यायाने भोई समाजाची बदनामी थांबवावी; अन्यथा भोई समाजाला देखील आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. तसेच सदरील प्रकारणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.” असे निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर भोई, संजय भोई, मधुकर भोई, अशोक भोई, बाळू भोई, विशाल भोई, गणेश भोई, अमोल भोई, ओखा भोई, प्रवीण भोई, शुभम भोई, पवन भोई, लक्ष्मण भोई, बंडू भोई, विनोद भोई, चेतन भोई, मनोज भोई, रोहन भोई, रितेश भोई, सतीश भोई यासह भोई समाज बांधवांची उपस्थिती होती.

Protected Content