गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

फैजपूर प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त निलेश  राणे यांच्या उपस्थितीत पिंटू भाऊ राणे मित्र परिवाराने फैजपूर येथील खाचणे हॉस्पिटल व सद्गुरू हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व जामनेर विधान सभा क्षेत्राचे आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या कार्याने एक ठसा उमटवला अश्या कर्मयोगी लोकनेत्याचा आज वाढदिवस.  गिरीश भाऊंना आरोग्यदूत, लोकनेते, भाजपा चे संकटमोचक, कुशल संघटक अश्या अनेक उपधींनी त्यांचा गौरव केला जातो. 

अतिशय प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीतुन सामान्य घरातील व्यक्ती जामनेर सारख्या भागातून जेव्हा सरपंच पदापासून ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारतो तेव्हा अश्या लोकनेत्याचा सन्मान गौरव व्हायलाच पाहिजे.

अश्या लोकनेत्याच्या जन्म दिनाच्या शुभ दिवशी फैजपूर माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते  निलेश  राणे यांच्या उपस्थितीत पिंटू भाऊ राणे मित्र परिवाराने फैजपूर येथील खाचणे हॉस्पिटल व सद्गुरू हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप केले. व भाऊंचा वाढदिवस साध्या पणाने साजरा केला. या प्रसंगी फैजपूर माजी उप नगराध्यक्ष राकेश जैन, सामाजिक कार्यकर्ते संदीप (गोटू) भारंबे, हनुमान जन्मोत्सव समिती अध्यक्ष वैभव भाऊ वकारे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू तेली, पराग पाटील, भरत कोल्हे, मयूर चौधरी विक्की सोनवणे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

Protected Content