हिंगोणा जि.प.उर्दू शाळेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

yaval school 1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारास संरक्षण भिंती बांधण्यात याव्या, अशी मागणी मुख्याध्यापक हाजी युसुफ अली तसेच विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

या संदर्भात माहीती अशी की, तालुक्यातील शाळा (दि. १७ जून) पासुन सुरु झाल्या असून, गावातील उर्दू माध्यमिक ही शाळा अतिशय वाहतुकीची वर्दळ असलेल्या मार्गावर असल्याने शाळेच्या आवारास संरक्षण भिंत बांधण्यात याव्या, अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक हाजी युसुफ अली व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मुक्तार, उपाध्यक्ष शब्बीर खान, यांच्यासह शाळेतील शिक्षक जे.वी.फारूकी, सल्लाउद्दीन फारूकी, सैय्यद अली मोहम्मद, सैय्यद मुक्तार अली, शेख रऊफ जनाब सैय्यद शफीक जनाब आदींनी केली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवुन स्वागत केले व त्यांना भावी शैक्षणीक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहीलेले उप-सरपंच वैशाली भोळे यांचे पती व माजी ग्राम पंचायत सदस्य भुषण भोळे यांनी सांगितले की, शाळेच्या आवारण १४ व्या वित्तीय आयोगाचा निधीतून संरक्षण भिंती बांधण्यात याव्या अशी मागणी केली असुन, याकडे लक्ष देवू असे आश्वासन दिली आहे.

Protected Content