मू. जे. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जळगाव, प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालय जळगाव (स्वायत्त) अंतर्गत सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी द्वारे ७ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

१) गर्भसंस्कार कार्यशाळा आणि जाहीर व्याख्यान : –
दि. १६ जून रोजी गर्भवती महिलांसाठी कार्यशाळा आणि जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन करून महिलांच्या समस्यांचे समाधान केले. प्रा. गीतांजली भंगाळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली.

२) ‘योग अँड नॅचरोपॅथी प्रॅक्टिस फॉर हेल्थी लंग्स’ तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा :-
दि. १९ ते २१ जून या तीन दिवसांमध्ये ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोवीड – १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती वर उपाय आणि प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ‘योग अॅण्ड नॅचरोपॅथी प्रॅक्टिस फॉर हेल्थी लंग्स’ या विषयावरील प्रात्यक्षिकासहीत विविध व्याख्यान या कार्यशाळेत प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आलीत. कार्यशाळेचा शुभारंभ १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. शशिकांत वडोदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे यांची उपस्थिती लाभली. तर तृतीय सत्रात २१ जून रोजी सकाळी ८ वाजता शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तीन दिवसीय या कार्यशाळेमध्ये प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. पंकज खाजबागे या विषय तज्ज्ञांनी विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी आभार व्यक्त करून शांतीपाठाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रध्दा व्यास आणि स्वप्नाली महाले याने केले. या कार्यशाळेसाठी ४३० योग निसर्गोपचार प्रेमींनी नोंदणी करून सहभाग नोंदविला.

३) महिलांसाठी नि:शुल्क योग शिबीर :-
दि. १६ ते २१ जून महिलांसाठी सकाळी ८ ते ९ या वेळात प्रा. ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनात नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला समाजातील महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

४) एन. सी. सी. कॅडेट्स करीता ऑनलाईन कार्यशाळा :-
दि. २० जून रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात एन. सी. सी. कॅडेट्स करीता योग विभाग आणि एन. सी. सी. युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन डॉ. देवानंद सोनार (संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा अॅण्ड नॅचरोपॅथी) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले होते. कार्यशाळेत एन. सी. सी. कॅडेट पायल महाजन हिने योग प्रात्यक्षिके करून दाखविली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून १८ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रवीण धीमन तसेच लेफ्टनंट डॉ. योगेश बोरसे यांचे उपस्थिती लाभली होती.

५) ऑनलाईन योग प्रात्यक्षिक वर्ग :-
दि. २१ जून रोजी सकाळी ६:३० वाजता आयोजित योग प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख योग महाविद्यालय चांदूर बाजार चे संचालक डॉ. आर. के. देशमुख यांची उपस्थिती लाभली. प्रा. गीतांजली भंगाळे यांनी ऑनलाईन योग प्रात्यक्षिके करून घेतली. राहुक्ल खरात यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. पंकज खाजबागे यांनीआभार व्यक्त केले.

६) शालेय विद्यार्थ्यांसाठी वाढते वय योगिक प्रक्रिया आणि पोषण या विषयावरील कार्यशाळा :-
दि. २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दिलीपकुमार चौधरी उपस्थित होते. कार्यशाळेत प्रा. ज्योती वाघ यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त योगिक प्रक्रिया करून घेतल्या तर डॉ. कल्पना गाजरे, इंदूर यांनी ‘वाढत्या वयामध्ये पोषणाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवानंद सोनार यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन अनुराधा सोमवंशी यांनी केले.

७) शहरातील विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकासाठी ऑनलाईन उपस्थिती :-
२१ जून रोजी शहरातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन उपस्थित राहून तर काही ठिकाणी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली.

सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञावंत श्री. नंदकुमार बेंडाळे (अध्यक्ष, के. सी. ई. सोसायटी, जळगाव) , प्रा. डॉ. सं. ना. भारंबे (प्राचार्य, मू. जे. महाविद्यालय, जळगाव), यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन प्राप्त झाले. विकास खैरनार, तन्मय गायकवाड, वासुदेव चौधरी, माधवी तायडे, राधिका पाटील, साहिल तडवी, विभागातील सर्व प्राध्यापक, बी. ए. आणि एम. ए. योगिक सायन्स व योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला . सर्व कार्यक्रम google meet आणि योग विभागाच्या you tube वाहिनीवरून लाईव्ह प्रसारित करण्यात आले. अशी माहिती योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी कळविली आहे.

Protected Content