रावेर गटविकास अधिकारीपदी विनोद मेढे यांची नियुक्ती !

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पूर्णवेळ गट विकास अधिकारी लाभले आहेत. विनोद मेढे यांनी नुकताच गट विकास अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांची नियुक्ती विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथून पदोन्नतीवर रावेर तालुक्यात करण्यात आली आहे.

विनोद मेढे यांच्यापूर्वी कार्यरत असलेल्या तत्कालीन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे रावेर पंचायत समितीची प्रतिमा वादग्रस्त ठरली होती. या प्रकरणामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाली होती आणि त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत होण्यास टाळाटाळ करत होते.

या सर्व पार्श्वभूमीवर, अनेक महिन्यांनंतर रावेर पंचायत समितीला पूर्णवेळ गट विकास अधिकारी मिळाल्याने विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. श्री. मेढे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचा कारभार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.