रामदेववाडी येथील चौघांचे बळी प्रकरण : दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रामदेववाडी येथील दुर्घटनेत चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील रहिवासी असलेल्या चौघांना भरधाव कारने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. या प्रकरणातील संशयितांमध्ये हाय प्रोफाईल मंडळीच्या महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुलांचा समावेश असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. १७ दिवस उलटून गेल्यावर देखील या तरूणांवर कारवाई न झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या दुर्घटनेत कारमधील अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज जळगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून जळगाव येथे त्यांना आणले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content