हुंड्यासाठी पवारवाडी येथील माहेरवाशीनीचा छळ

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील पवारवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी चांदवड येथे हुंडा मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ मे रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील पवारवाडी येथील माहेर असलेल्या अफरोज अश्फाक शेख वय-३५, यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील अश्फाक इसाक शेख यांच्याशी रीत रिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नात हुंडा कमी दिला. त्यावरून त्यांनी पुन्हा हुंडा मागितला. विवाहतेने माहेराहून पैसे आणले नाही. याचा राग मनात ठेवून तिचा वारंवार अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली. तसेच सासू-सासरे, दीर, दिराणी ननंद यांनी देखील पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पवारवाडी येथे निघून आल्या.

याप्रकरणी बुधवारी २२ मे रोजी दुपारी १२ वाजता महिलेने चाळीसगाव शहर पोलीसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती अशपाक इसाक शेख, सासू सायरा इसाक शेख, सासरे इसाक चांद शेख, दीर अजत इसाक शेख, दिरानी नाफीसा अमजद शेख, ननंद इरफान समीर खान सर्व रा. चांदवड जि.नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजय मालचे हे करीत आहे.

Protected Content