हद्दपार संशयीताला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार असलेल्या संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी शनिवार 22 एप्रिल रोजी जळगाव शहरातील मेहरून परिसरातील बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमातून अटक केली आहे. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (वय 26 रा. तांबापुरा )असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील मेहरून मध्ये शनिवारी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. सदर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित यात्रोत्सवात जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला जुनेद उर्फ बवाली युनूस शेख हा संशयित आला असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळस्कर , किशोर पाटील , सचिन पाटील, योगेश बारी , विशाल कोळी, राहुल रगडे यांच्या पथकाने मेहरून परिसरातील महादेव मंदिर येथून यात्रेतून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ लोखंडी सुरा मिळून आला होता. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . त्याचे वर यापूर्वी आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

Protected Content