Home धर्म-समाज भडगावात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

भडगावात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षाप्रमाणे यंदाही भडगावात बहुभाषीक श्री ब्राह्मण सेवा संघ, श्री. परशुराम जन्मोत्सव समिती व ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढून भगवान परशुराम यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आली.

शोभायात्रा श्री ब्राह्मण सेवा संघाच्या कार्यालयापासून काढण्यात आली. यावेळी भगवान परशुराम यांचे प्रतिमा पुजन करून रथमार्गाने निघाली. या शोभायात्रेत ट्रॅक्टरमध्ये श्री भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच या शोभायात्रेत या संख्येने समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावुन शोभायात्रेत समाज बांधवांचा उत्साह वाढविला.

शोभायात्रेत विनय जकानदार, नानाशास्त्री टीवगांवकर गुरुजी, उदय देशमुख, रवि कुलकर्णी, विजय देशपांडे, राजू जकानदार, योगेश दिक्षीत, बापू व्यवहारे, द्विप सहस्रबुद्धे, शशी झाडेगेकर, विकास जोशी, प्रमाद पारी राहुल देशपांडे, कैफास व्यास, सतिष वाजपेयी, भुषण जोशी, मंथन दिक्षीत, गुरुवर्य पुर्णपात्री सर, संजम जोगी, अँड. कुळकर्णी व समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound