वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

जळगाव,प्रतिनिधी । भाजपा जिल्हा महानगर उपाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रदिप रोटे  यांच्या वाढदिवसानिमित्त अयोध्या नगर मित्रमंडळ व मंडल क्र ३ च्या वतीने परिसरातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे  यांनी  प्रदिप रोटे यांना पंडित दिनदयाल उपाध्य यांचे पुस्तक भेट दिले.  यावेळी आमदार भोळे यांनी प्रदिप रोटे यांनी पक्षासाठी व अयोध्या नगर परिसरासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख केला.  याप्रसंगी नगरसेविका रंजना वानखेडे , जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप रोटे, विजय वानखेडे, किसन मराठे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी युवा मोर्चाचे अक्षय जेजुरकर आदी उपस्थित होते.

 

Protected Content