पांडुरंग टॉकीज परिसरातून तरुणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरातून एका तरुणाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ९ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तेजस प्रल्हाद बराटे वय-२२, रा.पांडुरंग टॉकीज परिसर, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी क्लासेस चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ एएल १४२८) त्याच्या घरासमोर ८ मे रोजी रात्री ८ वाजता पार्किंगला लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून दिली. ही घटना दुसऱ्या दिवशी ९ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. तरुणांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्याला दुचाकी कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे अखेर बुधवार २२ मे रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर हे करीत आहे.

Protected Content