‘तु माझ्याकडे का बघतो’ विचारल्याच्या रागातून मुलासह आईला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । ‘तु माझ्याकडे का पाहतो’ असा जाब विचारल्यावरून मुलासह विवाहितेला चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कानळदा येथे शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रजीया मजीद पिंजारी (वय-४५) रा. कानळदा ता.जि.जळगाव ह्या मुलगा फारूखसह राहतात. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुलगा फारूख पिंजारी यांने गावातील रविंद्र पुरूषोत्तम उर्फ लिलाधर सपकाळे हा खून्नसने पाहत होता. माझ्याकडे खुन्नसने का बघतो असा जाब फारूखने विचारल्याने रविंद्रला राग आला. रविंद्र सपकाळे यांच्यासह पुरूषोत्तम बुधो सपकाळे, अंजनाबाई पुरूषोत्तम सपकाळे आणि नरेंद्र पुरूषोत्तम सपकाळे सर्व रा. कानळदा ता.जि.जळगाव यांनी शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर नरेंद्र सपकाळे यांना लोखंडी आसारीने फारूखच्या डोक्यात हाणली. यात फारूख गंभीर जखमी झाला. हा प्रकार सुरू असतांना रजीया पिंजारी आवराआवर करण्यासाठी गेले असता त्यांनी चौघांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रजीया पिंजारी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोउनि कदीर तडवी करीत आहे.

Protected Content