Home Cities अमळनेर अमळनेरात महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

अमळनेरात महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

0
49

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील माळवाडा येथे ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, माळीवाडा परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहिला आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या परिसरात राहणारा संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल सनांसे हा ४ डिसेंबर रोजी दारूपिऊ मध्यरात्री विवाहितेच्या घरी आला. शिवीगाळ व मारहाण करत तिच्या अंगला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आहे. सकाळी विवाहितेने पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत सांगितली. विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र सनांसे याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound