महापालिकेचे उपायुक्तांची कार फोडली (व्हिडीओ )


जळगाव प्रतिनिधी । कोरोना रोखण्यासाठी तोंडावर मास्क वापरणे अनिवार्य असतांना तोंडावर मास्क वापरण्याचे सांगितल्याचा राग असल्याने हॉकर्सधारकांनी महापालिकेच्या उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या वाहनांवर दगडफेक करून शासकीय वाहनाचे नुकसान केल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्णसंख्या  वाढत आहे. त्यात शासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहे. यात सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, तोंडावर मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझर वापरणे आदींचा समावेश आहे. आज शहरातील सुभाष चौक ते बागवान मोहल्ला परीसर दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केली. यात विनामास्क वापरणाऱ्या हॉकर्सधारकांना मास्क वापरा अन्यथा दंडात्मक कारवाईचा सुचक इशारा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिले. त्यानंतर ते बागवान मोहल्लकडे जात असतांना काही अज्ञात हॉकर्सधारकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.  शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून वाहन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

https://www.facebook.com/508992935887325/videos/453526629215491