जळगाव संदीप होले । भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेे.
आज भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापन दिन असून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज पक्षाच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आज सकाळी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे आणि महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते पक्षाचा झेंडा फडकावण्यात आला. तसेच भारतमाता व दिवंगत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3598514450260918