
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवार २१ मे रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय उत्तम तायडे वय-५५, रा. विठ्ठल मंदिर जवळ भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे त्यांचे दुचाकी (एमएच १९ सीएल ८३६३) आहे. २० मे रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी २१ मे रोजी सकाळी ६ वाजता उघड केला आली या प्रकरणी बुधवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहे.



