बोदवडात शिक्षकाचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

बोदवड प्रतिनिधी । शहरातील हेडगेवार नगरात शिक्षकाचे बंद घर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन तुळशीराम क्षीरसागर (वय-४९) रा. चिखली ता. मुक्ताईनगर ह.मु. हेडगेवार नगर जळगाव हे शिक्षक असून आपल्या कुटुंबियासह राहतात. मंगळवारी २२ जून रोजी ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील कपाटातून १० हजाराची रोकड, २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि १० हजार रूपये किंमतीचे चांदी असा एकुण ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जगन क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे करीत आहे. 

Protected Content