एरंडोलमध्ये जखमी दृष्टि सर्पावर पशुवैद्यकांकडून यशस्वी उपचार

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, एरंडोल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आज एका जखमी दृष्टि सर्पाची (स्पेक्टॅकल्ड कोब्रा) यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हा सर्प जवळच्या गावात दगडांमध्ये अडकलेला आढळून आला. संघर्षादरम्यान त्याला दोन खोल जखमा झाल्या होत्या. स्थानिक सर्पमित्राने त्याला वाचवून एरंडोल दवाखान्यात आणले.

पशुवैद्यक डॉ. अविनाश रणवीर (VD उत्तरण) यांनी सर्पाच्या जखमांचे निरीक्षण करून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि टाके घातले. या प्रक्रियेत डॉ. प्राप्ती पारखे (VD एरंडोल) आणि डॉ. राहुल साळुंखे (VD पिंपळकोठा) यांनी सहकार्य केले. ऑपरेशननंतर सर्पाला योग्य उपचार आणि निगा देण्यात आली. एमयूव्ही कर्मचारी आणि दवाखान्यातील ड्रेसर* यांनीही या कार्यात मदत केली. सर्प संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा घटनांमुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील सहजीवन अधिक दृढ होण्यासाठी चालना मिळेल.

Protected Content