वंचितची पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी, तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नांदेडमधून अविनाश भोसिकर, परभणीमधून बाबासाहेब भुजंगराव उगले, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुणेमधून वसंत मोरे शिरूरमधून मंगलदास बागूल यांचा समावेश आहे.

पुण्यातून मनसेचे ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी देऊन मोठी खेळी केली आहे, तर बारामतीमधून उमेदवार न देता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. अशाप्रकारे अशा चर्चा होत आहे की वंचितची भूमिका ही महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्वक खेळी करत आहे. पुण्यात आता वंचितचे वसंत मोरे, भाजपचे मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची तिरंगी लढत होणार आहे.

Protected Content