माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तब्बल ३३ वर्षांनंतर राज्यसभेतून निवृत्त

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतात उदारीकरणाची सुरूवात करणारे डॉ. मनमोहन सिंह हे तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कार्यकाळानंतर ३ एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्यासोबत इतर ५४ खासदारांचा देखीस संसदेतील कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पहिल्यादा राज्यसभेवर जात आहे. त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या अनेक निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे रुप बदलले. मनमोहन सिंह हे १९९१ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर पोहोचले होते. त्यावेळी पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्र्याची जबाबदारी सांभाळली होती. या काळातच अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर विदेशी कंपन्यासाठी भारत मुक्त बाजारपेठ बनला. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. मनमोहन सिंग सध्या ९१ वर्षांचे आहेत.

Protected Content