महाराष्ट्रात पंतप्रधानांची पहिली सभा ‘या’ मतदारसंघात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भाच्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सत्तधारी भाजप पक्ष प्रचारासाठी जोरदार तयारी करत आहे. रामटेक या महाराष्ट्रातील मतदारसंघात महायुतीचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार १० एप्रिल रोजी होणार आहे, तर दुसरी सभा १४ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आहे, तर चंद्रपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहे. यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे.

Protected Content