अवैध वाळू वाहतूक थांबविण्याबाबत निवेदन; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक त्वरित थांबवावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष व तालुक्याच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदनावेळी देण्यात आला आहे.

गेल्या 15ऑक्टोबर 2021 रोजी तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांचे मामा बाळू भोई रा. घोडसगाव नवे यांना वाळूचे ढंपर नं.MH 280 BB 4129 या वाहनाने चिरडले होते. जिवंत राहण्याचा एकही चान्स नव्हता, अशा परिस्थितीत भोई यांनी कसेबसे पैसे समाज बांधवांकडून जमविले व त्यांचे प्राण वाचविले. दरम्यान, यात दिवसरात्र वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. तहसीलदार मुक्ताईनगर याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पर्यायाने मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे व तालुक्याच्या वतीने मधुकर भोई यांच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, तालुका अध्यक्ष मधुकर भोई, जनहित कक्षचे मू.नगर विधान सभा अतुल जावरे, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भोई, गण अध्यक्ष सुनील कोळी, मंगेश कोळी, गण अध्यक्ष यश पाटील, गोपाळ कोळी, आकाश कोळी अन्य मनसे  सैनिक उपस्थित होते.

 

 

 

 

 

Protected Content